पोस्ट्स

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गाजलेले मुद्दे

विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे, धर्म युद्ध, व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, एक है तो सेफ है, घरबश्या मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा दिल्या गेल्या . मविआकडून गद्दार, खोके, मिंधे, धारावी पुनर्विकास प्रकल्प, अदानींच्या मुद्द्यावरून जहरी टीका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, शाहांपासून ते राहुल गांधींच्या सभा गाजल्या. जे विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करत होते तेच त्यांच्या जाहीरनाम्यात 3 हजार रुपये देण्याचं आश्वासन देताना दिसले. निकालानंतर जी आकडेवारी समोर आली ती स्वत: भाजपा नेत्यांनाही अपेक्षित नसेल अशीच. इतके एक्झिट पोल, ओपिनियन पोल झाले, यात आकडेवारी दर्शवली त्यात मविआ आसपासही फिरकताना दिसली नाही. महायुतीत एकट्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळाल्यात त्या महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळूनही आल्या नाहीत. लोकसभेत हिरो बनलेली काँग्रेस विधानसभेत कशी झिरो झाली हे कळायला मार्ग नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, धीरज देशमुखांचा पराभव झाला. राजेश टोपे, वैभव नाईक, बच्चू कडूही निवडणूक हरलेत. या मातब्बर ...

टवाळखोरांना आवरा

मुंबईच्या खारमध्ये कोरियाहून आलेल्या पर्यटक महिलेची 2 टवाळखोरांनी छेड काढली. हा प्रकार निंदनीय असून मुंबईकरांची, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान शरमेनं खाली घालणारा आहे. आज छेड काढली, उद्या बलात्कारही करतील, यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. नुसती अटक, जेल नको तर यांना अद्दल घडवायला हवी. पर्यटकांच्या वस्तू चोरणं, त्यांच्यासमोर अश्लील चाळे करणं, असे प्रकार वाढलेत. हे विदेशी लोकांसोबतच नाही तर कोणत्याच व्यक्तीसोबत व्हायला नको, हे गुंडप्रवृत्तीचे लोक कधी सुधरणार काय माहीत? स्वत:सोबत इतराचंही आयुष्य खराब करून ठेवतात, म्हणून लोकं चांगल्या लोकांवरही विश्वास ठेवायला घाबरत आहेत.

आहेत ती गावं सांभाळा, मग सीमेवरची गावं महाराष्ट्रात आणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर ताबा घेण्यासंदर्भात दावा केला. त्यांच्या या वक्तव्यावरून काहींचा थयथयाट झाला परंतू त्यांनी हे विधान का केलं त्याला काहीतरी कारण आहे. जत तालुक्यातील गावं दुष्काळी भागात आहे. सरकारकडे वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा सरकार त्यांना करत नव्हतं. म्हणून 117 गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव संमत केला होता. यानंतर सरकारनं म्हैसाळ नावाची पाणीपुरवठा योजना राबवली तरीही अर्ध्याच गावांपर्यंत पाणी पोहोचलं. बोम्मईंच्या वक्तव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. पाणी द्या नाहीतर एनओसीचीही वाट पाहणार नाही. थेट कर्नाटकात जाऊ, असा इशाराच दिला आपण कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरची मराठी लोकसंख्येची गावं महाराष्ट्रात घेण्याच्या मोठ्या मोठ्या बाता मारतो परंतू जी गावं आहेत तीच नीट सांभाळता येत नाहीत आणि चालले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा द्यायला, स्वत:ची कर्तव्य आधी नीट पार पाडा. पाण्यासारखी बेसिक सोय आपण गावकऱ्यांसाठी करू शकत नाही त्या सर...

तुमच्या आमच्या श्रद्धेचा बिझनेस

देशात सध्या देवी-दैवतांच्या नावानं मस्त बिझनेस सुरू आहे. जितकी मोठी मूर्ती तितकी जास्त गर्दी आणि दानाची रक्कमही हे फक्त गणेशोत्सव काळातच होतंय असं नाही परंतू आपल्या आपल्या गणेश मंडळांचं मार्केटिंग व्हावं, म्हणून ज्या बॉलिवूडवर देवी-दैवतांचा अपमान केल्याचा, तोकडे कपडे घालून अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला जातो, त्यांनाच दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. इतकंच नाहीतर मंडळांच्या सोशल मीडिया पेजवरून लाईव्ह करून आम्ही किती वाजता येतोय, केव्हा येतोय, याची माहिती स्वत: बॉलिवूड अभिनेत्री देत होत्या. दर्शनासाठी गर्दी जमवण्यासाठी ही मार्केटिंगची नवी पद्धत. लालबागच्या राजाला यंदाच्या वर्षी 5 किलोहून अधिक सोनं आणि 60 किलोहून अधिक चांदी दान करण्यात आली. याशिवाय 4 कोटींहून अधिक रक्कम दानपेटीत जमा झाली. सोन्या चांदीचे दागिने, पैसे दान करण्याची ही आतापर्यंतची पद्धत मात्र एका भाविकानं लालबागच्या राजाला चक्क बाईक गिफ्ट दिली. आता काय गणपती बाईकवर बसून फेरफटका मारणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. आता तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात 200 रुपयांचा पास घेतल्यानंतरच देवीचं दर्शन घेता येणार. पैसे कमवण्यास...

पळून लग्न करताय.. या गोष्टींचा एकदातरी विचार कराच...

याने/हिने पळून लग्न केलं. याची/हिची मुलगी पळून गेली, असं आपण सहज बोलतो आणि नावं ठेऊन मोकळं देखील होतो. मात्र हे सगळं ऐकून समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय, याचा विचार केलाय कधी? अशीच वेळ कधी तुमच्यावर आली आणि तुम्हाला कोणी असं बोलून गेलं तर मी तर बऱ्याचदा असं बोलतानाही लोकांना ऐकलंय, की ज्या भावाची बहीण पळून लग्न करते किंवा दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करते, तेव्हा तिच्या भावानं बांगड्या घालाव्यात, यांना इज्जत आहे का? चारचौघात उभं राहण्याची लायकी आहे का? हे तर एका बहिणीलापण सांभाळू शकले नाहीत. माझ्या बहिणीने असं केलं असतं तर मारून टाकलं असतं, असं भडकवणारे खूप आहेत. खरं तर अशा लोकांचे खायचेदेखील वांदे असतात आणि हे इज्जत काय असते याचे दाखले देतात. लग्नाच्या भर मंडपातही त्यांचा अपमान करतात. बावळट प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. याच सगळ्या गोष्टींमुळे समाजाच्या प्रतिष्ठेपायी औरंगाबादच्या वैजापूरमध्ये जसं भावानं आणि आईनं मिळून पळून लग्न करणाऱ्या मुलीचं शीर धडावेगळं केलं होतं आणि त्याचा सेल्फी पोस्ट केला होता, अशा घटना घडतात. बीडमधलं सुमीत वाघमारे हत्याकांडही याचं आणखी एक उदाहरण. त्याम...

निदान 14 एप्रिलसारख्या सणाला तरी दारू नको....

उद्या (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.. ज्या महामानवामुळे आपण आहोत.. ज्यांनी रात्रीचा दिवस करून कष्ट केले त्यांची जयंती उत्साहात, थाटात साजरी करण्यात काहीच गैर नाही,परंतू ती साजरी करताना काही स्वयंघोषित नियम असावेत असं वाटतं.. कारण जेव्हा 14 एप्रिलच्या मिरवणुकीत तुम्ही निळे झेंडे, फेटे घालून मिरवता तेव्हा तुम्ही एक व्यक्ती नसता तर बाबासाहेब यांनी ज्या समाजच प्रतिनिधित्त्व केलं होतं त्या समाजाचा भाग असता.. आता मी तुम्हाला नावं ठेवतीये किंवा उपदेशाचे डोस पाजतेय असं नाही, तर एक आदर्श जयंती कशी असावी याबद्दल मत मांडतेय.. लहापणापासून जयंतीच्या मिरवणुकीत जात होते, तिथे डिजेच्या तालावर नाचल्याशिवाय मी काहीच केलं नाही. परंतू बऱ्याचदा अनेक पुरुष मंडळी दारू पिऊन नाचताना,धिंगाणा घालताना दिसली...नाचा नाचण्यात काही गैर नाही परंतू दारू पिऊन नाचू नका.. मी 14 एप्रिलला दारू पिणार नाही.. जर कोणी पिऊन जयंतीला येत असेल तर त्याला येऊ देणार नाही हे प्रत्येकाने ठरवायला हवं.. कारण जेव्हा आपण निळे झेंडे घेऊन मिरवणुकीत असतो तर ती तुमची एकट्याची बदनामी नसते तर पूर्ण समाजाची असते आणि तुमच्या मूर्ख...

मोदीजींचा ताफा ते महामृत्यूंजयचा जप

पंतप्रधान मोदींचा ताफा पंजाबच्या काही शेतकरी संघटनांनी अडवला, यानंतर पंतप्रधान मोदींचं सुरक्षित पोहोचल्याचं tweet आणि सुरू झाला तो नाटकाचा नवा अंक... ताफा अडवल्याच्या काही तासांनंतर गॅस दरवाढीविरोधात एल्गार पुकारून नावारूपाला आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पत्रकार परिषद घेऊन पंजाब सरकारवर प्रश्नांचा, आरोपांचा भडिमार केला.. हे सगळं तिथपर्यंत ठीक आहे.. परंतू दुसऱ्या दिवशी (6 जानेवारी 2021) मुंबई भाजप युवा मोर्चाच्या बिनपगारी कार्यकर्त्यांनी दादरच्या काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून हंगामा केला... हे सगळं एकंदरीत पाहता प्रश्न पडतोय पंजाब सरकारचा निषेध हा महाराष्ट्रात का केला गेला?... नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांनीदेखील पंजाब सरकारचा पुतळा दहन करून त्यांच्यातली आग शांत केली... इतकं कमी की काय भाजप आमदार आशिष शेलार आणि इतर भाजप नेत्यांनी तर थेट मंदिर गाठत महामृत्यूंजय मंत्राचा जप सुरू केला.. त्यानंतर candle मार्चही काढला... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीदेखील मुंबा देवीकडे मोदींजींच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातलं... किती ती बिचाऱ्या मोदीजींची काळजी.. बापरे! देशाच्या सर्व...