साडी आणि आठवणी
प्रत्येक मुलीच्या साडीची आठवण वेगळी आहे... दररोज नेसून मिरवता येणं सध्या कठीण असली तरी हवी हवीशी वाटणारी... शाळेच्या गॅदरिंगला नववारी नेसायची असो की हळदीकुंकू, शिक्षकदिन, send-off असो किती ती धावपळ तयारीची.... मात्र प्रत्येक मुलीची पहिली साडी ही आईचीच.. त्यानंतर मग शेजारी, मावशी, मामी, काकीकडे मोर्चा... बरं तो जेव्हा घरी पहिल्यांदा मला बघायला आला तेव्हा नेसलेली साडी जरा जास्तच special होती, आधी ड्रेस घालून जाऊ असं ठरवलं नंतर अचानक माहित नाही मनात काय आलं? मी साडीत त्याला आवडावं म्हणून नाही तर मला चांगलं दिसायचं होतं म्हणून.... दुसरी साखरपुड्याची साडी... भर हॉलमध्ये सासरच्या मंडळींनी ओटीभरून त्याच्या नावाने दिलेली साडी.. तो सगळा माहोल काही वेगळाच होता.... या एका हिरव्या साडीसाठी पनवेल ते ठाणे अशी दुकानं चाळून, मला फोटोंवर फोटो, video call करून दाखवलेल्या अनेक साड्या नाकारल्या... शेवटी भरतक्षेत्रमध्ये मी स्वतः फायनल केलेली ही साडी... आणि साडी घेण्यापेक्षा मनासारखे blouse शिवून मिळणं, ती व्यवस्थित नेसून कॅरी करणं गरजेचं... भरलेले शालू, कडक, फुगणारी साडी सोडून कोणतीही साडी नेसण्यात, त...