आहेत ती गावं सांभाळा, मग सीमेवरची गावं महाराष्ट्रात आणा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर ताबा घेण्यासंदर्भात दावा केला. त्यांच्या या वक्तव्यावरून काहींचा थयथयाट झाला परंतू त्यांनी हे विधान का केलं त्याला काहीतरी कारण आहे. जत तालुक्यातील गावं दुष्काळी भागात आहे. सरकारकडे वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा सरकार त्यांना करत नव्हतं. म्हणून 117 गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव संमत केला होता. यानंतर सरकारनं म्हैसाळ नावाची पाणीपुरवठा योजना राबवली तरीही अर्ध्याच गावांपर्यंत पाणी पोहोचलं. बोम्मईंच्या वक्तव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. पाणी द्या नाहीतर एनओसीचीही वाट पाहणार नाही. थेट कर्नाटकात जाऊ, असा इशाराच दिला आपण कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरची मराठी लोकसंख्येची गावं महाराष्ट्रात घेण्याच्या मोठ्या मोठ्या बाता मारतो परंतू जी गावं आहेत तीच नीट सांभाळता येत नाहीत आणि चालले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा द्यायला, स्वत:ची कर्तव्य आधी नीट पार पाडा. पाण्यासारखी बेसिक सोय आपण गावकऱ्यांसाठी करू शकत नाही त्या सरकारला काय म्हणावं?
(महाराष्ट्रातली गावं कर्नाटकात जावीत असं माझं अजिबात म्हणणं नाही परंतू गावकऱ्यांसाठी जर पाण्यासारखी बेसिक सोय होत नसेल तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा विचार व्हायलाच हवा, जे सरकार काळजी घेईल, तो हक्कही सांगेन)
पूजा उजगरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा