निदान 14 एप्रिलसारख्या सणाला तरी दारू नको....
उद्या (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.. ज्या महामानवामुळे आपण आहोत.. ज्यांनी रात्रीचा दिवस करून कष्ट केले त्यांची जयंती उत्साहात, थाटात साजरी करण्यात काहीच गैर नाही,परंतू ती साजरी करताना काही स्वयंघोषित नियम असावेत असं वाटतं.. कारण जेव्हा 14 एप्रिलच्या मिरवणुकीत तुम्ही निळे झेंडे, फेटे घालून मिरवता तेव्हा तुम्ही एक व्यक्ती नसता तर बाबासाहेब यांनी ज्या समाजच प्रतिनिधित्त्व केलं होतं त्या समाजाचा भाग असता.. आता मी तुम्हाला नावं ठेवतीये किंवा उपदेशाचे डोस पाजतेय असं नाही, तर एक आदर्श जयंती कशी असावी याबद्दल मत मांडतेय..
लहापणापासून जयंतीच्या मिरवणुकीत जात होते, तिथे डिजेच्या तालावर नाचल्याशिवाय मी काहीच केलं नाही. परंतू बऱ्याचदा अनेक पुरुष मंडळी दारू पिऊन नाचताना,धिंगाणा घालताना दिसली...नाचा नाचण्यात काही गैर नाही परंतू दारू पिऊन नाचू नका.. मी 14 एप्रिलला दारू पिणार नाही.. जर कोणी पिऊन जयंतीला येत असेल तर त्याला येऊ देणार नाही हे प्रत्येकाने ठरवायला हवं.. कारण जेव्हा आपण निळे झेंडे घेऊन मिरवणुकीत असतो तर ती तुमची एकट्याची बदनामी नसते तर पूर्ण समाजाची असते आणि तुमच्या मूर्खपणामुळे काही अतीहुशार लोकं आपसूकच बाबासाहेबांना नावं ठेवतात.. त्यामुळे नाचा, bindass नाचा, पण दारू पिऊन निदान या दिवशी तरी नको..plus मिरवणुकीशिवाय आणखी काही उपक्रम राबवता येऊ शकतात का? आपल्या माणसांचं प्रबोधन करण्यासाठी काही करता येईल का हेही पाहा.. अनेक ठिकाणी भिमजयंतीला वकृत्व, निबंध स्पर्धा, करिअर मार्गदर्शनसारखे कार्यक्रम घेतात.. परंतू ज्या झोपडपट्टीमधल्या जयंती आहेत त्याचं रूपडं काही बदलताना दिसलं नाही.. सर्वांनी सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब यांना जसा समाज अपेक्षित होता तो होण्यास 0.1 टक्के तरी हातभार लागेल.. कारण ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आज लाखो लोकं रस्त्यावर उतरली आहेत ती बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला सहज मिळालीये... फक्त त्याचा उपयोग कसा आणि कुठे करायचा याविषयी जनजागृतीची गरज आहे.. यामुळे आपल्या समाजातील सुशिक्षित मुलींनी, मुलांनी पुढे येणं गरजेचं आहे.. कारण आज जे भारतात मुस्लिम समाजासोबत होतंय तेच काही दिवसांनी मागासवर्गीयांसोबत होईल.. ते वाट्टेल तसं वागतील.. परंतू दुसरे काय करतायेत यावर निर्बंध आणतील म्हणून आत्ता खऱ्या अर्थानं सगळया समाजानं जागृत राहणं गरजेचं आहे..#14april#drbabasahebAmbedkar
पूजा उजगरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा