पोस्ट्स

पळून लग्न करताय.. या गोष्टींचा एकदातरी विचार कराच...

याने/हिने पळून लग्न केलं. याची/हिची मुलगी पळून गेली, असं आपण सहज बोलतो आणि नावं ठेऊन मोकळं देखील होतो. मात्र हे सगळं ऐकून समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय, याचा विचार केलाय कधी? अशीच वेळ कधी तुमच्यावर आली आणि तुम्हाला कोणी असं बोलून गेलं तर मी तर बऱ्याचदा असं बोलतानाही लोकांना ऐकलंय, की ज्या भावाची बहीण पळून लग्न करते किंवा दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करते, तेव्हा तिच्या भावानं बांगड्या घालाव्यात, यांना इज्जत आहे का? चारचौघात उभं राहण्याची लायकी आहे का? हे तर एका बहिणीलापण सांभाळू शकले नाहीत. माझ्या बहिणीने असं केलं असतं तर मारून टाकलं असतं, असं भडकवणारे खूप आहेत. खरं तर अशा लोकांचे खायचेदेखील वांदे असतात आणि हे इज्जत काय असते याचे दाखले देतात. लग्नाच्या भर मंडपातही त्यांचा अपमान करतात. बावळट प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. याच सगळ्या गोष्टींमुळे समाजाच्या प्रतिष्ठेपायी औरंगाबादच्या वैजापूरमध्ये जसं भावानं आणि आईनं मिळून पळून लग्न करणाऱ्या मुलीचं शीर धडावेगळं केलं होतं आणि त्याचा सेल्फी पोस्ट केला होता, अशा घटना घडतात. बीडमधलं सुमीत वाघमारे हत्याकांडही याचं आणखी एक उदाहरण. त्याम...

निदान 14 एप्रिलसारख्या सणाला तरी दारू नको....

उद्या (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.. ज्या महामानवामुळे आपण आहोत.. ज्यांनी रात्रीचा दिवस करून कष्ट केले त्यांची जयंती उत्साहात, थाटात साजरी करण्यात काहीच गैर नाही,परंतू ती साजरी करताना काही स्वयंघोषित नियम असावेत असं वाटतं.. कारण जेव्हा 14 एप्रिलच्या मिरवणुकीत तुम्ही निळे झेंडे, फेटे घालून मिरवता तेव्हा तुम्ही एक व्यक्ती नसता तर बाबासाहेब यांनी ज्या समाजच प्रतिनिधित्त्व केलं होतं त्या समाजाचा भाग असता.. आता मी तुम्हाला नावं ठेवतीये किंवा उपदेशाचे डोस पाजतेय असं नाही, तर एक आदर्श जयंती कशी असावी याबद्दल मत मांडतेय.. लहापणापासून जयंतीच्या मिरवणुकीत जात होते, तिथे डिजेच्या तालावर नाचल्याशिवाय मी काहीच केलं नाही. परंतू बऱ्याचदा अनेक पुरुष मंडळी दारू पिऊन नाचताना,धिंगाणा घालताना दिसली...नाचा नाचण्यात काही गैर नाही परंतू दारू पिऊन नाचू नका.. मी 14 एप्रिलला दारू पिणार नाही.. जर कोणी पिऊन जयंतीला येत असेल तर त्याला येऊ देणार नाही हे प्रत्येकाने ठरवायला हवं.. कारण जेव्हा आपण निळे झेंडे घेऊन मिरवणुकीत असतो तर ती तुमची एकट्याची बदनामी नसते तर पूर्ण समाजाची असते आणि तुमच्या मूर्ख...

मोदीजींचा ताफा ते महामृत्यूंजयचा जप

पंतप्रधान मोदींचा ताफा पंजाबच्या काही शेतकरी संघटनांनी अडवला, यानंतर पंतप्रधान मोदींचं सुरक्षित पोहोचल्याचं tweet आणि सुरू झाला तो नाटकाचा नवा अंक... ताफा अडवल्याच्या काही तासांनंतर गॅस दरवाढीविरोधात एल्गार पुकारून नावारूपाला आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पत्रकार परिषद घेऊन पंजाब सरकारवर प्रश्नांचा, आरोपांचा भडिमार केला.. हे सगळं तिथपर्यंत ठीक आहे.. परंतू दुसऱ्या दिवशी (6 जानेवारी 2021) मुंबई भाजप युवा मोर्चाच्या बिनपगारी कार्यकर्त्यांनी दादरच्या काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून हंगामा केला... हे सगळं एकंदरीत पाहता प्रश्न पडतोय पंजाब सरकारचा निषेध हा महाराष्ट्रात का केला गेला?... नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांनीदेखील पंजाब सरकारचा पुतळा दहन करून त्यांच्यातली आग शांत केली... इतकं कमी की काय भाजप आमदार आशिष शेलार आणि इतर भाजप नेत्यांनी तर थेट मंदिर गाठत महामृत्यूंजय मंत्राचा जप सुरू केला.. त्यानंतर candle मार्चही काढला... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीदेखील मुंबा देवीकडे मोदींजींच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातलं... किती ती बिचाऱ्या मोदीजींची काळजी.. बापरे! देशाच्या सर्व...

जिस देश की गंगा में लाशे बेहती है...

कोरोनाची तिसरी लाट, नवनवीन व्हेरियंट येतायेत... लोकं ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी मेली... इतक्या मोठया संख्येने ज्या देशात कोरोनाचे बळी गेले की स्मशानात प्रेत जाळायला सुद्धा जागा नव्हती.. पण देशाच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती मात्र देशवासीयांना motivate करण्यात आणि मन की बात record करण्यात व्यस्त होती... जेंव्हा यूपीत प्रेत गंगेत टाकून देण्याची वेळ आली तेव्हा एकाही राजकीय नेत्याने त्यावर भाष्य केलं नाही.. परंतू आता यूपीच्या निवडणुका येताच मोठमोठ्या भव्य रॅली काढून आम्हीच कसे देशाचे कर्तृत्त्ववान नेते आहोत हे दाखवण्याचा ढोंगीपणा केला जातोय....नेहमी उपदेशाचे डोस पाजनारे सन्मानिय पंतप्रधान आणि आवडते कर्तव्यदक्ष केंद्रीय गृहमंत्री यांच्या रॅली दरम्यानची तुडूब भरलेली गर्दी आपण पहिलीच आहे.सतत कोरोना नियमांचं पालन करा, अशी गरळ ओकणारे निवडणुकीत गांजा मारतात की काय असा मला नेहमी प्रश्न पडतो. मोदी आणि अमित शहा जाऊद्या but केजरीवालही याबाबतीत मागे राहिलेले नाहीत.. बर देशाचं जाऊद्या आपल्या राज्यातले chutiye पण काही कमी नाहीत.. यांची लग्न, मालवणी महोत्सव, निवडणुका पहिल्याच आहेत की...मला फक्त इतकं...