मोदीजींचा ताफा ते महामृत्यूंजयचा जप
पंतप्रधान मोदींचा ताफा पंजाबच्या काही शेतकरी संघटनांनी अडवला, यानंतर पंतप्रधान मोदींचं सुरक्षित पोहोचल्याचं tweet आणि सुरू झाला तो नाटकाचा नवा अंक... ताफा अडवल्याच्या काही तासांनंतर गॅस दरवाढीविरोधात एल्गार पुकारून नावारूपाला आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पत्रकार परिषद घेऊन पंजाब सरकारवर प्रश्नांचा, आरोपांचा भडिमार केला.. हे सगळं तिथपर्यंत ठीक आहे.. परंतू दुसऱ्या दिवशी (6 जानेवारी 2021) मुंबई भाजप युवा मोर्चाच्या बिनपगारी कार्यकर्त्यांनी दादरच्या काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून हंगामा केला... हे सगळं एकंदरीत पाहता प्रश्न पडतोय पंजाब सरकारचा निषेध हा महाराष्ट्रात का केला गेला?... नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांनीदेखील पंजाब सरकारचा पुतळा दहन करून त्यांच्यातली आग शांत केली... इतकं कमी की काय भाजप आमदार आशिष शेलार आणि इतर भाजप नेत्यांनी तर थेट मंदिर गाठत महामृत्यूंजय मंत्राचा जप सुरू केला.. त्यानंतर candle मार्चही काढला... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीदेखील मुंबा देवीकडे मोदींजींच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातलं... किती ती बिचाऱ्या मोदीजींची काळजी.. बापरे!
देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींची सुरक्षा महत्त्वाची आहेच पण मला इतकंच म्हणायचय ज्यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मुलगा भर सभेत शेतकऱ्यांना गाडीने तुडवत त्यांचा जीव घेतो, त्यावेळेस इराणी मॅडम, लाडके चंद्रकांतदादा, शेलार आणि भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते झोपी जातात का ?, असा साधा प्रश्न उपस्थितीत राहतो.. त्यावेळेस एकही भाजप नेता पत्रकार परिषद घ्यायला पुढे का सरसावत नाही किंवा आंदोलन करत नाही.. तुमचा तो जीव दुसऱ्याचं काय?..
#Narendramodi #bjp #chandrakantpatil # AshishShelar #smriti irani
पूजा उजगरे
👌अगदी बरोबर
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंस पुजू... bjp मध्ये आंधळे भक्त आहेत
उत्तर द्याहटवा